कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार !
कोल्हापूर, २६ जुलै (वार्ता.) – चंदगड तालुक्यातील कुदनूर या गावात २३ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा पुतळा साडेचार टन वजनाचा असून तो लोकवर्गणीतून उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण घेऊन ते आत्मसात् करावेत, यांसाठी भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. राहुल पवार यांनी दिली. सध्या संभाजीनगर येथे २१ फूट उंचीचा पुतळा असून हा पुतळा सर्वाधिक उंचीचा ठरणार आहे.