सोलापूर येथे मराठी जैन साहित्य संमेलनाचे आयोजन !
सोलापूर, २६ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र जैन परिषदेचे २५ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे २९, ३० आणि ३१ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संमेलन स्वागत समितीचे कार्याध्यक्ष डॉ. सरिता कोठीया आणि केतन शहा यांनी दिली. ३ दिवस चालणार्या संमेलनात ग्रंथदिंडी, परिचर्चा, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन असे कार्यक्रम होणार आहेत.