वागळे (चाळीसगाव) येथे पाटलीपुत्र एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले !
जळगाव – येथील चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या जवळच्या वागळे गावाजवळ एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले. या घटनेत कुठलीही जीवित किंवा अनुचित घटना घडलेली नाही. लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस मुंबईकडून भुसावळकडे जात असतांना हा प्रकार घडला. संबंधित कर्मचार्यांनी इंजिन परत मागे आणून डब्यांना जोडले.