तेलंगाणा येथील कु. ओम कुलकर्णी याला १० वीच्या परीक्षेत ९५.८० टक्के गुण !
तेलंगाणा, २६ जुलै (वार्ता.) – कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील आणि सध्या भाग्यनगर येथे वास्तव्यास असणारे सनातनचे साधक श्री. प्रशांत कुलकर्णी अन् सौ. प्रकृती कुलकर्णी यांचा मुलगा कु. ओम प्रशांत कुलकर्णी याला १० वी (सी.बी.एस्.सी.)च्या परीक्षेमध्ये ९५.८० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तो भाग्यनगर येथील ‘इंडस व्हॅली इंटरनॅशनल स्कूल’चा विद्यार्थी असून त्याचा शाळेत प्रथम क्रमांक आला आहे.
आपल्या यशाविषयी कु. ओम म्हणाला, ‘‘मी प्रतिदिन शनीमंत्र म्हणत असे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या साधनेतील नामजप करणे, कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे यांमुळे मनाची एकाग्रता होण्यास पुष्कळ साहाय्य झाले. माझी मावशी (सौ. कविता बेलसरे) यांच्याकडून सुटीत भगवद्गीतेच्या १२ वा अध्याय, संस्कृत सुभाषिते, विविध मंत्र, पसायदान इत्यादी शिकल्याने त्याचाही पुष्कळ लाभ झाला. माझे आजी-आजोबा (सौ. सुलभा कुलकर्णी (आईची आई), आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, श्री. दत्तात्रय कुलकर्णी (आईचे वडील), आध्यात्मिक पातळी ६५ टक्के,) हे सुद्धा वेळोवेळी प्रार्थना, नामजप, स्वभावदोष यासंबंधी मार्गदर्शन करत असत. त्यामुळे मन स्थिर रहायला साहाय्य झाले.’’