सोलापूर येथे वाहतुकीचे नियम तोडणार्या २२ शालेय बस जप्त !
सोलापूर – शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे सर्व नियम मोडून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या २२ शालेय बस ‘आर्.टी.ओ.’च्या पथकाने जप्त केल्या आहेत. शहरात ५२५ शालेय बस असून अनेकांनी रजिस्ट्रेशन (नोंदणी) केलेले नाही, तर काहींनी गाडीचे ‘फिटनेस प्रमाणपत्र’ घेतलेले नाही. २६ जुलै या दिवशी १७३ शालेय बसगाड्यांची तपासणी करण्यात आली, त्या वेळी ही कारवाई करण्यात आली. सोलापूर आणि अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकांकडून विविध भागांत कारवाई करण्यात आली. शालेय बसचालकांना दंड करून त्यांच्याकडून २ लाख ७५ सहस्र ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. (संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. – संपादक)