अमेरिकेला तीव्र आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल ! – जगप्रसिद्ध अर्थतज्ञ
न्यूयॉर्क – अमेरिकेला तीव्र आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल. अमेरिकेला आधीच ४ दशकांतील सर्वाधिक महागाई भेडसावत आहे. मंदी, मोठे कर्ज आणि आर्थिक संकट यांमागे विविध कारणे आहेत. हीच स्थिती जगातील अन्य विकसित देशांचीही होणार आहे, असे वक्तव्य येथील जगप्रसिद्ध अर्थतज्ञ नौरील रुबिनी यांनी केले. रुबिनी पुढे म्हणाले की, येणारी आर्थिक मंदी थोड्याच कालावधीसाठी असेल, हे म्हणणे अयोग्य आहे.
Economist Nouriel Roubini said the US is facing a deep recession as interest rates rise and the economy is burdened by high debt loads https://t.co/HtZbgx5rle via @markets
— Reed Landberg (@rvlandberg) July 26, 2022
न्यूयॉर्क विश्वविद्यालयातील प्राध्यापक नौरील रुबिनी यांनी वर्ष २००८-०९ मधील आर्थिक मंदीविषयी बरोबर भाकीत वर्तवले होते. त्यामुळे त्यांना ‘डॉक्टर डूम’ (‘डूम’ म्हणजे भविष्यात घडणारी अप्रिय घटना) असे संबोधण्यात येते. सध्या अमेरिकेतील महागाईचा दर ९.१ टक्क्यांवर पोचला आहे.