दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारु प्यायल्याने २८ जणांचा मृत्यू
३० जण अत्यवस्थ
बोटाद (गुजरात) – जिल्ह्यातील रोजिद गावामध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण अद्यापही अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना कह्यात घेतले आहे. गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि कर्णावती गुन्हे शाखा यांचे पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. मद्य तस्कराकडून ही दारू विकत घेण्यात आली होती, असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
Botad spurious liquor tragedy | A total of 28 people have died in the tragedy: Gujarat DGP Ashish Bhatia pic.twitter.com/BlC5hZdMkT
— ANI (@ANI) July 26, 2022
संपादकीय भूमिकादारुबंदी असतांनाही दारु उपलब्ध होेते आणि ती पिऊन काही जणांचा मृत्यू होतो, हे पोलीस अन् प्रशासन यांना लज्जास्पद ! देशात कितीही कायदे आणि बंदी घातली, तर गुन्हे काही थांबत नाहीत. याला भ्रष्टाचार हेच मुख्य कारण आहे. तो दूर करण्यासाठी शासनकर्त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे; मात्र ‘भ्रष्टाचारी नाहीत’, असे शासनकर्ते देशात आहेत तरी का ? |