अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ घोषित करावा ! – अजित पवार
मुंबई – विदर्भ, मराठवाडा यांसह अन्य ठिकाणी झालेल्या अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २५ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.
या पत्रात अजित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, २० पासून राज्यात सातत्याने पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांत मी स्वत: जाऊन पहाणी केली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी मी सातत्याने दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे. पावसामुळे झालेल्या हानीचे पंचनामे अद्यापही होऊ शकलेले नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. १०० हून अधिक व्यक्तींचा अतीवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. यासाठी तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन बोलवावे.