विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिला भोसकणार्याला गावकर्यांनी झाडाला उलटे लटकवून चोपले !
गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील घटना !
पाटण (गुजरात) – जिल्ह्यातील वाणा गावात अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आणि तिला शस्त्राद्वारे भोसकणार्याला गावकर्यांनी पकडून झाडाला उलटे लटकवले आणि काठ्यांद्वारे चोपले. यात तो बेशुद्ध पडला. जीवन ठाकोर असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ही विद्यार्थिनी शाळेत जात असतांना ही घटना घडली. तिला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. गावाजवळ आरोपी दिसताच गावकर्यांनी त्याला पकडले.