म्यानमार सैन्याकडून माजी खासदारासह ४ जणांना फाशी
न्येपिडोअर (म्यानमार) – म्यानमार सैन्याने एका माजी खासदारासह लोकशाहीसाठी लढणार्या चार कार्यकर्त्यांना फाशी दिली. या चौघांवरील आतंकवादी कृत्ये केल्याचे आरोप सिद्ध झाले होते. वर्ष १९८८ नंतर प्रथमच म्यानमारमध्ये फाशी देण्यात आली असल्याचे संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात येत आहे. वर्ष २०२१ मध्ये म्यानमारच्या सैन्याने सत्तेची सूत्रे हाती घेतली. याविरोधात देशव्यापी आंदोलने करण्यात आली होती.