गुजरातमध्ये मद्यपान करणार्या भाजपच्या नेत्याला द्यावे लागले त्यागपत्र !
नवी देहली – गुजरातमधील भाजपचे नेते रश्मीकांत वसावा हे मद्यपान करून नशेच्या धुंदीत असलेला एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला. गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने या विरोधात आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी निषेध नोंदवून वसावा यांच्या त्यागपत्राची मागणी केली. वाढता विरोध पाहून वसावा यांनी छोटा उदयपूरच्या जिल्हाध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. एकूणच या प्रकरणावरून राज्यातील मद्यबंदीच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.
The BJP district president from Chhotaudepur, Gujarat resigned after his video of faltering went viral on social media.@saurabhv99 https://t.co/sHXO0aHWzT
— IndiaToday (@IndiaToday) July 25, 2022
संपादकीय भूमिकाराजकीय नेत्यांकडूनच कायद्याचे पालन होत नसल्याने जनता कायदाद्रोही झाल्यास आश्चर्य ते काय ? |