हाजीपूर (बिहार) येथे साधूंचा वेश परिधान करून भीक मागणार्या ५ मुसलमान तरुणांना बजरंग दलाने पकडले !
वैशाली (बिहार) – येथील हाजीपूरमध्ये साधूचा वेश परिधान करून आणि सजवलेला बैल घेऊन भीक मागणार्या ५ मुसलमान तरुणांना कह्यात घेण्यात आले आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. त्यांच्याकडून २ आधार कार्ड आणि ५ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व जण उत्तरप्रदेशातील रहाणारे आहेत.
बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष आर्यन सिंह म्हणाले की, हे सर्व रोहिंग्या मुसलमान आहेत. ते कुठल्या तरी संघटनेशी संबंधित आहे. हे एक षड्यंत्र आहे.
बिहारः बसहा बैल लेकर भिक्षाटन करते 6 मुस्लिम युवकों को बजरंग दल ने पकड़ा, पुलिस कर रही पूछताछ https://t.co/A42gQaoXEf
— Hindustan (@Live_Hindustan) July 24, 2022
संपादकीय भूमिका
|