बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे डोक्यावर भगवा फेटा बांधून दोघा मुसलमानांकडून थडग्यांवर आक्रमण !
जिल्ह्यात कावड यात्रेच्या कालावधीत दंगल घडवण्याचे षड्यंत्र उघड !
बिजनौर (उत्तरप्रदेश) – हिंदूंप्रमाणे वेशभूषा करून जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या सीमेतील ३ मजारींवर (मुसलमानाच्या थडग्यांवर) आक्रमण करून धार्मिक दंगल घडवण्याचा धर्मांधांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला. या प्रकरणी पोलिसांनी महंमद आदिल आणि महंमद कमाल या दोघा भावांना अटक केली आहे.
UP police thwart conspiracy by Kamal and Adil to blame Hindus for the desecration of Mazar in Bijnor: Detailshttps://t.co/Wqa5jvpV2r
— OpIndia.com (@OpIndia_com) July 25, 2022
१. महंमद आदिल आणि महंमद कमाल यांनी आक्रमणात करून येथील थडग्याची तोडफोड केली, तसेच त्यावरील चादरी अन् पडदे जाळले.
२. ही घटना घडत असतांना स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यावर या घटनेनंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोचले आणि त्यांनी दोघांना पकडले.
३. पोलीस दोघा भावांची कसून चौकशी करत असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या तोडफोडीमागील नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. ‘हे दोघे भाऊ पकडले गेले नसते, तर हिंदूंच्या विरोधात हिंसाचार झाला असता’, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
४. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देतांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, शेरकोट पोलिसांनी मोठी घटना घडण्यापासून रोखली. पोलिसांना २४ जुलैला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ‘जलाल शाह मजारवर तोडफोड करून चादरी जाळण्यात आल्या आहेत’, अशी माहिती मिळाली. यावर कडक कारवाई करत पोलीस तपास करेपर्यंत त्याच पोलीस ठाण्याच्या सीमेतील भुरेशहा मजारवर तोडफोड झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे पोचून तेथेही कारवाई केली. आरोपी आदिल आणि कमाल या दोघांनी डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा बांधला होता. कावड यात्रेच्या कालावधीत अशी घटना घडवून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
संपादकीय भूमिकाहिंदूंसाठी ही धोकादायक घटना आहे ! हिंदूंना हिंसाचारी दाखवून मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात हिंसाचार करायला लावण्याचा हा प्रयत्न आहे. अशा घटना भविष्यात यशस्वी ठरल्या, तर हिंदू स्वतःचे रक्षण करू शकतील का ? यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला आता पर्याय राहिलेला नाही, हे लक्षात घ्या ! |