केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेणारे हिंदुद्वेषी अधिवक्ता अवध प्रताप ओझा यांची भगवान श्रीकृष्णावर अश्लाघ्य टीका !
नवी देहली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (‘यु.पी.एस्.सी.’च्या) विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेणारे प्रसिद्ध अधिवक्ता अवध प्रताप ओझा यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि बलाराम यांच्यावर टीका केली आहे. या व्हिडिओत ओझा म्हणतात, ‘‘बलरामाने एकदा श्रीकृष्णाला सांगितले, ‘तुला यादव लोक पकडून मारणार आहेत.’ यावर श्रीकृष्णाने त्याला ‘का’ असे विचारल्यावर बलराम म्हणाला, ‘तू त्याच्या पत्नींच्या समवत नाचतोस, तर मारणार नाहीत का ?’’ त्यावर श्रीकृष्ण म्हणतो, ‘तू ताण घेऊ नको, मी सर्व संभाळून घेईन.’ यानंतर एकेदिवशी वृंदावनात पूर आल्यावर श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलतो. ते पाहून यादव म्हणतात, ‘तू आमच्या पत्नींसमवेत नाचत होतास, आता तू मेहुण्यांच्या समवेतही नाचू शकतोस. आम्हाला काहीच अडचण नाही.’’
‘यादवों की बीवियों संग नाचते थे श्रीकृष्ण, बाद में सालियाँ भी दे दी’: UPSC वाले ‘ओझा सर’ छात्रों को यही पढ़ा रहे, इस्लाम को बताते हैं दुनिया की रोशनी#Ojhasir #Hinduphobiahttps://t.co/s2UiQE3msS
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 23, 2022
इस्लामचे कौतुक !
काही दिवसांपूर्वी ओझा यांचा इस्लामचे कौतुक करणारा एक व्हिडिओ समोर आला होता. यात त्यांनी इस्लामला ‘महान’ संबोधत ब्राह्मणांवर मात्र टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘ब्रिटिशांकडून मार खाणारे आता छाती वर करून फिरत आहेत.’ त्यांनी म्हटले होते की, जो कुणी नेहरू यांना चुकीचे म्हणतो, तो सर्वाधिक मूर्ख आहे.
संपादकीय भूमिका
|