हिंदु असल्याचे सांगत नईम मियां याच्याकडून हिंदु मुलीवर बलात्कार !
पीडितेच्या बहिणीचेही केले लैंगिक शोषण
सिमडेगा (झारखंड) – हिंदु असल्याचे भासवून नईम मियां नावाच्या वासनांधाने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पुढे ती गरोदर राहिल्यावर तिने नईम याच्याकडे विवाह करण्याचा आग्रह केला. तेव्हा नईमने त्याची खरी ओळख सांगून मुलीशी विवाह करण्यास नकार दिला. नईमने तरुणीच्या अल्पवयीन बहिणीवरही बलात्कार केला होता. या विरोधात तिने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून पोलीस फरार असलेल्या नईम याचा शोध घेत आहेत.
Love Jihad in Jharkhand: Naeem Mian poses as Sandeep Singh to marry Hindu woman, rapes her minor sisterhttps://t.co/CT2fsn9xeU
— OpIndia.com (@OpIndia_com) July 24, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी नईमसमवेत ५ वर्षे रहात होती. नईमने दोन्ही बहिणींशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्याने याचे चित्रीकरण केले होते आणि त्या माध्यमातून तो त्या दोघींना धमकावत होता.
संपादकीय भूमिका
|