वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील एका गावातील शिवमंदिरातील शिवपिंडीची अज्ञातांकडून तोडफोड
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील पलहीपट्टी गावातील शिवमंदिरातील शिवपिंडीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना उघड झाल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला. यानंतर सरपंच हुकूम सिंह यांनी शिवपिंडीवर सीमेंट लावून ती नीट केल्यानंतर लोक शांत झाले. (धर्मशास्त्रानुसार खंडित झालेली मूर्ती आदींचे पूजन करण्याऐवजी त्यांचे विसर्जन करून तेथे नवीन मूर्तींची प्रतिष्ठपना करणे आवश्यक असते ! – संपादक)
वाराणसी में शिव मंदिर में जल चढ़ाने पहुंची महिलाएं तो क्षतिग्रस्त मिला शिवलिंग, 4 घंटे बाद कराया गया मरम्मत #Varanasi #Up #UttarPradesh #UpNews #Sawan #Mandir #Shivling https://t.co/h9tRUk0pH7
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) July 25, 2022
तोडफोडीची घटना रात्रीच्या वेळी घडली. सकाळी महिला पूजेसाठी मंदिरात आल्यावर ही घटना लक्षात आली. येथे कुणीही पुजारी नाही. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! याला उत्तरदायी असणार्यांचा शोध घेऊन त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा ! |