जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या परतीच्या पालखीचे पुण्यात स्वागत
पुणे – हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडून देहू नगरीच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे २३ जुलै या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. शहराच्या वतीने महापालिकेचे साहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.