नाशिक येथील काळाराम मंदिरातील गाभार्याला गळती !
नाशिक – गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिराच्या गाभार्याला गळती लागली आहे, तसेच काही ठिकाणी ओलही आली आहे. भाविक याविषयी अप्रसन्न आहेत. श्री काळाराम मंदिराला ३ दालने असून पहिल्या दालनात घंटा, दुसर्या दालनात दक्षिण आणि उत्तरद्वार असून तिसर्या दालनात गाभारा आहे. दुसरे दालन आणि गाभारा येथेही पाणी गळत आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराचे पॉलिशचे काम, तसेच बांधकाम करण्यात आले होते. या कामामुळेच गळती होत असल्याचा तर्क व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे मंदिराच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
संपादकीय भूमिकामंदिरांची दुःस्थिती दूर करण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होणे हाच पर्याय आहे ! |