सोजत रोड (राजस्थान) येथे मोदी कुटुंबियांकडून वर्षश्राद्धानिमित्त ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जागृती करण्याचा कौतुकास्पद प्रयत्न
सोजत रोड (राजस्थान) – येथील सनातनचे साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. बंकटलालजी मोदी यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आलेल्या आप्तस्वकियांमध्ये मोदी कुटुंबाच्या वतीने धर्मजागृती करण्यात आली. या वेळी त्यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेल्या षड्यंत्राची माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि इतरांमध्ये जागृती करण्याचा निश्चय केला. या प्रसंगी अनेक नातेवाइक आणि परिचित उपस्थित होते.