मुंबई महानगरपालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांची १ ऑगस्टपासून कामबंद आंदोलनाची चेतावणी !
मुंबई – वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या बंधपत्रित सेवेसाठी रखडलेल्या नियुक्त्या, तसेच वरिष्ठ निवासी आणि हाऊस अधिकारी यांच्या नियुक्त्यांवर लावलेले निर्बंध यांचा परिणाम सेवेवर होत आहे. रुग्णालयांतील कर्मचार्यांवर कामाचा भार येत आहे. त्यामुळे रुग्णालयांतील रिक्त जागा वेळेत भराव्यात, अन्यथा १ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करू, अशी चेतावणी मुंबई महानगरपालिकेच्या ‘केईएम्’, नायर, लोकमान्य टिळक आणि कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडून देण्यात आली आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे पदव्युतरच्या दुसर्या आणि तिसर्या वर्षाच्या विद्यार्थ्यांवर कामाचा ताण येत आहे. हे लक्षात घेता वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, असे प्रसिद्धीपत्रक मार्डकडून काढण्यात आले आहे.