मुंबईत ‘बेस्ट’ची मोनोच्या खांबाला धडक !
मुंबई – बेस्ट बसच्या चालकाला अपस्माराचा (फीट) झटका आल्याने त्याचे नियंत्रण सुटून बस मोनोच्या खांबाला धडकली. ही घटना सकाळी चेंबूर वसाहत परिसरात घडली. बसमध्ये १२ ते १५ प्रवासी होते; पण यात कुणीही घायाळ झाले नाही; मात्र बसची काही प्रमाणात हानी झाली आहे. स्थानिकांनी बसचालकाला बाहेर काढून रुग्णालयात भरती केले.