‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ नावाची दहशत वाढली पाहिजे ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते
पुणे – जेव्हा ८० टक्के हिंदूंना दुखवायचे असेल, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चिखलफेक केली जाते, इतकी ‘सावरकर’ या नावाची दहशत आहे. सावरकरांची दहशत ब्रिटिशांना होती; काँग्रेसलाही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे !’ असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या माधव सदाशिव गोळवलकरगुरुजी विद्यालयात २४ जुलै या दिवशी ‘मृत्युंजयी सावरकर’ नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्व थोडक्या शब्दांत विषद करत विरोधकांवर टीका केली.
ते पुढे म्हणाले की, जगामध्ये कोणत्याही देशात एका देशभक्ताचा झाला नसेल, तेवढा अवमान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतात झाला. आता यापुढे हे चित्र पालटले पाहिजे. एक ही सावरकरप्रेमी मुले आहेत, तर दुसरा ५० वर्षे वयाचा मुलगा देहलीत आहे, ज्याला गोळवलकर हे नावही घेता येत नाही. सावरकरप्रेमी आला म्हटले की, विरोधकांनी घाबरायला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आताच्या पिढीमध्ये रुजले पाहिजेत.