(कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्या देहावसानानंतर जाणवलेली सूत्रे !
१. ‘१६.७.२०२२ या दिवशी सकाळी ७ वाजता सौ. शालिनी मराठेकाकू यांचे देहावसान झाल्याचे माझी सून सौ. प्रीती हिने सांगितले. त्या वेळी माझे मन एकदम निर्विचार झाले.
२. १६.७.२०२२ या दिवशी त्यांचे अंत्यदर्शन घेतांना मला त्यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘लागला जिवाला आनंदाचा छंद ।’, ही कविता आठवली आणि त्या खरोखरंच ‘निर्गुणात गेल्या आहेत’, असे मला वाटले.
३. त्या वेळी त्यांचा देह शांत आणि आनंदी जाणवत होता.’
– श्रीमती शर्मिला पळणीटकर, फोंडा, गोवा. (१६.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |