युवा साधना शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर रत्नागिरी येथील कु. सूरज सूर्यकांत कदम यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती
१. शिबिराचा पहिला दिवस
१ अ. मनात अनावश्यक आणि नकारात्मक विचार येणे : ‘युवा साधना शिबिरासाठी रामनाथी आश्रमात येईपर्यंत माझ्या मनाची स्थिती चांगली होती; पण शिबिराच्या पहिल्या दिवशी माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक विचार येऊ लागले. ‘शिबिरातून निघून जाऊया’, असे मला वाटत होते.
१ आ. नामजप केल्यावर त्रास न्यून होणे : मी मला होणारे त्रास नियोजन करणार्या साधकाला सांगितले. तेव्हा त्यांनी मला उत्तरदायी साधकाला विचारून ४५ मिनिटे नामजप करायला सांगितला. मी तो नामजप ध्यानमंदिरात बसून केल्यावर माझा त्रास न्यून झाला.
१ इ. मानस दृष्ट काढल्यावर बरे वाटणे : उत्तरदायी साधकाने मला स्वतःची मानस दृष्ट काढायला सांगितली. त्या वेळी मी श्री हनुमानाला प्रार्थना केली. तेव्हा मला जाणवले, ‘श्री हनुमानाने नारळ हातांत धरला आहे. मला त्रास देणारी वाईट शक्ती त्या नारळात जात आहे.’ त्यानंतर काही वेळाने मला बरे वाटले.
२. शिबिराचा दुसरा दिवस
या दिवशी आध्यात्मिक त्रासाची वरीलप्रमाणे स्थिती होती; परंतु नियोजन करणार्या साधकाला मी याविषयी सांगू शकलो नाही.
३. शिबिराचा तिसरा दिवस
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन चालू झाल्यावर मनात अनावश्यक विचार येऊन ताण येणे : तिसर्या दिवशी शिबिरात काही घंटे बरे वाटत होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन चालू झाले. तेव्हा माझ्या मनात अनावश्यक विचार येऊन मला ताण आला. त्यानंतर दिवसभरात काही वेळ माझी स्थिती तशीच होती, तर काही वेळ चांगली होती.’
– कु. सूरज सूर्यकांत कदम, रत्नागिरी (नोव्हेंबर २०२१)
|