मालवण समुद्रकिनार्यावर अतीउत्साही पर्यटकांकडून धोकादायक वर्तन
मालवण – मालवण समुद्रकिनार्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक बुडता बुडता वाचणे, समुद्रकिनार्यावरील वाळूत वाहने अडकणे, अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. याविषयी समुद्रकिनार्यावर आवश्यक त्या सूचनाही लावण्यात आल्या आहेत. असे असतांनाही काही अतीउत्साही पर्यटक या धोक्याकडे दुर्लक्ष करून समुद्रकिनार्यावर जिवावर बेतणारे धोकादायक वर्तन करतात. अशीच एक घटना २२ जुलै या दिवशी मालवण समुद्रकिनार्यावर पहायला मिळाली. समुद्राला ओहोटी आल्याने येथील बंदर जेटी किनारपट्टीवरील वाळूवर काही पर्यटक त्यांची चारचाकी गाडी मोठ्या वेगात गोलाकार फिरवत असल्याचे (स्टंट करत असल्याचे) निदर्शनास आले. स्थानिकांनी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत त्या पर्यटकांनी हा प्रकार (स्टंटबाजी) चालूच ठेवला होता. त्यानंतर काही वेळाने हे पर्यटन निघून गेले. नुकताच या ठिकाणी एक टेम्पो बुडण्यापूर्वी वाचवण्यात आला होता. (जिवावर बेतू शकेल, असे धोकादायक वर्तन करून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांना वेठीस धरणार्या अशा पर्यटकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तरच अशा प्रकारांवर आळा बसू शकेल ! – संपादक)