बांगलादेशी हिंदूंवरील आक्रमणांच्या विरोधात हिंदूंकडून शांततापूर्ण पद्धतीने देशव्यापी निदर्शने !
आम्ही केव्हापर्यंत हिंसा सहन करायची ? – असाहाय्य बांगलादेशी हिंदूंचा प्रश्न
ढाका – बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होण्याच्या विरोधात तेथील अनेक संघटनांनी देशव्यापी प्रदर्शने आणि मोर्चे काढले. शांततापूर्ण रूपाने आयोजित या आंदोलनांमध्ये हिंदू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याचाच एक भाग म्हणून चटगांवमध्येही एक मोठा मोर्चा काढण्यात आला. हिंदूंवरील आक्रमणे, हिंदु शिक्षकांच्या हत्या आणि हिंदु महिलांवर बलात्कार या विरोधात या वेळी आवाज उठवण्यात आला.
सौजन्य : Hindustan Times
याआधी बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमा खान म्हणाले की, माझे सरकार धार्मिक सौहार्द बिघडवणार्या लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कटीबद्ध आहे. (‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’, असाच हा प्रकार ! – संपादक) बांग्लादेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही गृह मंत्रालयाला आक्रमणाचे अन्वेषण करून हिंदूंवरील आक्रमणे रोखण्यात दायित्वशून्य भूमिका घेणार्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.
एका पीडित हिंदु महिलेची बोलकी प्रतिक्रिया !आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या एका पीडित हिंदु महिलेने म्हटले की, आम्हाला हे ठाऊक नाही की, हिंसेचे हे संकट आम्हाला केव्हापर्यंत सतावत राहील ? आम्हाला न्याय आणि संरक्षण कोण देणार ? हिंसाचारामध्ये माझा जीवही गेला असता. देवाने मला वाचवले; परंतु जीवित रहाण्याची ही कोणती पद्धत आहे ? माझ्या शरिरावर आता केवळ ही एक साडी उरली आहे. |
संपादकीय भूमिका
|