केंद्रशासन कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांची औषधे ७० टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्याची शक्यता
नवी देहली – केंद्र सरकार कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारासाठी आवश्यक औषधांच्या किमतीत कपात करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारने प्रस्ताव सिद्ध केला आहे; मात्र घोषणेविषयी अंतिम निर्णय होणे शेष असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रस्ताव संमत झाल्यानंतर किमती ७० टक्क्यांपर्यंत अल्प होतील. सध्या व्यापक प्रसारात असलेल्या औषधांचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक औषधांच्या ‘राष्ट्रीय सूची २०१५’ मध्ये सुधारणा करण्याचे काम करत आहे.