(म्हणे) ‘शहरांच्या नावांत पालट करत हिंदु-मुसलमान यांमध्ये वीषपेरणी !’
अबू आझमी यांचा तथ्यहीन आरोप !
सोलापूर – ज्या शहरांना मुसलमानांची नावे देण्यात आली आहेत, तीच नावे जाणीवपूर्वक पालटली जात आहेत. वर्ष १९६५ मध्ये भारत-चीन युद्धात मीर उस्मानअली यांनी ६ टन सोने भारत सरकारला दिले होते. अशा भारतीय व्यक्तीचे नाव राज्य सरकारला सहन झाले नाही, म्हणून त्यांनी ‘उस्मानाबाद’ शहराचे नाव पालटले. (याच निझामाला स्वातंत्र्यानंतर त्याचे ‘हैद्राबाद’ संस्थान भारतात समाविष्ट करायचे नव्हते. या निझामांच्या रझाकारांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. आझमी हे सत्य सोयीस्करपणे लपवत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक) नामांतराच्या सूत्रावरून सरकार हिंदु आणि मुसलमान यांच्यात विष पेरत आहे, असा तथ्यहीन आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केला.
आझमी पुढे म्हणाले की, देशातील सभ्यता, संस्कृती, बंधूभाव आणि सामाजिक एकोपा जाणीवपूर्वक नष्ट केला जात आहे. यामुळेच शाळा-महाविद्यालये यांमध्ये हिजाब (डोके आणि मान झाकण्यासाठी मुसलमान स्त्रियांनी वापरलेले वस्त्र) घालण्यास बंदी घातली जात आहे. (कन्हैयालाल, उमेश गुप्ता यांच्या हत्या, तसेच हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांधांनी केलेले आक्रमण हा बंधूभाव होता का ? अशा घटनांच्या वेळी आझमी गप्प का रहातात ?, हे न कळायला जनता दूधखुळी नाही ! – संपादक) वर्ष २०१४ नंतर राजकारण पालटले आहे. केवळ हिंदु-मुसलमान वाद निर्माण करायचा आणि मते गोळा करायची, असे कारस्थान केले जात आहे. सध्या ‘सर्वांत चांगला हिंदू कोण ?’, अशी स्पर्धा चालू आहे. (मग आझमी यांना त्याचा पोटशूळ का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|