बागपत येथे मुसलमानांच्या विरोधानंतरही गेली ५ वर्षे कावड यात्रेत सहभागी होतात बाबू खान !
प्रतिदिन करतात शिवमंदिराची स्वच्छता !
बागपत (उत्तरप्रदेश) – येथील बाबू खान हे गेल्या ५ वर्षांपासून कावड यात्रा करत आहेत. जेव्हा पहिल्यांदा वर्ष २०१८ मध्ये त्यांनी कावड यात्रा केली होती, तेव्हा त्यांना स्थानिक मुसलमानांनी मशिदीतून बाहेर काढले होते; मात्र तरीही गेली ५ वर्षे ते कावड यात्रेत सहभागी होत आहेत.
Uttar Pradesh: Babu Khan participates in Kanwar Yatra for third time, was thrown out of mosque the first time but didn’t leave Islam, he sayshttps://t.co/2HFyEzyl6H
— OpIndia.com (@OpIndia_com) July 23, 2022
बाबू खान यांनी सांगितले की, जेव्हा मी पहिल्यांदा कावड यात्रेत सहभागी झालो, तेव्हा घरामध्ये भांडणे झाली. मी कुटुंबियांची कशीतरी समजूत काढली. त्या वेळी यात्रेवरून आल्यावर महादेव मंदिरात जलाभिषेक केला. दुसर्या दिवशी मशिदीत नमाजपठणासाठी गेलो असता माझ्यावर बहिष्कार घालून मला बाहेर काढण्यात आले. याविषयी मी पोलिसांत तक्रार केल्यावर मशिदीतून बाहेर काढणार्यांना अटक करण्यात आली. आता मी पहाटे ५ वाजता मशिदीत जाऊन नमाजपठण करतो आणि नंतर शिवमंदिरात जाऊन स्वच्छता करतो. मी इस्लामचा त्याग केलेला नाही; मात्र माझी कावड यात्रेवर श्रद्धा आहे. त्यामुळे मी प्रतिवर्षी हरिद्वार येथे जातो.
संपादकीय भूमिका
|