परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘संभवामि युगे युगे ।’ या वचनाचे मानकरी ! – भागवताचार्य श्री. बाळासाहेब बडवे, पंढरपूर
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे पुजारी आणि माजी विश्वस्त भागवताचार्य श्री. बाळासाहेब बडवे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८.५.२०१७ या दिवशी परात्पर गुरुदेवांना गंध लावून साक्षात् श्री विठ्ठलाचा तुळशीहार घातला. त्या वेळी श्री. बाळासाहेब बडवे म्हणाले, ‘‘चतु:श्लोकी भागवतातील ‘एतावदेव जिज्ञास्यंतत्त्व…’ या ४ थ्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे स्वत:तील आत्मतत्त्व आपल्यासमोर सिंहासनावर विराजमान आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा तुळशीहार आज श्रीकृष्णालाच घातला. यावरून दोन्ही तत्त्वे एकत्र आली आहेत, हेच दिसते. ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।’ हा योग आज सार्थकी लागला. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ‘संभवामि युगे युगे ।’ या वचनाचे मानकरी आहेत.’’