भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे त्याने परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने पृथ्वीवर पुनश्च अवतार घेतला आहे ! – सिद्धाचार्य वैद्य पुण्यमूर्ती, तंजावुर, तमिळनाडू
‘परात्पर गुरु डॉक्टरांचे शरीर म्हणजे श्रीमन्नारायण आणि त्यांच्या शरिरातील प्राण म्हणजेच भगवान शंकर ! त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमाच्या परिसरातील एकेका झाडामध्ये एकेका देवतेचे तत्त्व आहे. अनेक झाडांमध्ये श्री महालक्ष्मीचे तत्त्वही आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे, ‘संभवामि युगे युगे ।’, म्हणजे ‘मी प्रत्येक युगात पुनः पुन्हा अवतार घेतो’ त्याप्रमाणे त्याने परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार घेतला आहे ! या त्यांच्या दैवी कार्यास मी सर्वतोपरी साहाय्य करणार आहे !’
– सिद्धाचार्य वैद्य पुण्यमूर्ती, तंजावुर, तमिळनाडू (११.६.२०१६)