कारखान्याचे रसायनयुक्त पाणी मिसळले गेल्याने कृष्णा नदीत सहस्रो मासे मृत्यूमुखी !
सांगली – गेल्या आठवड्यापासून कृष्णा नदीत रसायनयुक्त पाणी मिसळले गेल्याने कसबे डिग्रज परिसरात सहस्रो मासे मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले आहे. नदीला वाढलेले पाणी आणि पावसाच्या पाण्याचा लाभ घेऊन कारखान्यांनी रसायनयुक्त पाणी सोडल्याने मासे, तसेच अन्य जलचर जीव मृत्यूमुखी पडले आहेत.
या संदर्भात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे म्हणाले, ‘‘याविषयी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्याची नोंद घेतली जात नाही. या संदर्भात संबंधित कारखान्यांवर कार्यवाही होण्यासाठी लेखी तक्रार केली आहे. तरीही प्रक्रिया न केलेले पाणी नदीत सोडले जाते आणि अशा घटना वारंवार घडतात. यावर नियंत्रण ठेवण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे.’’
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या उत्सवांवर नेहमीच डोळे वटारणार्या प्रदूषण नियंत्रण मंडळाची सोयीस्कर डोळेझाक ! |