श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पायरी मार्गावरील तटबंदी कोसळली !
सातारा, २३ जुलै (वार्ता.) – सततच्या अतीवृष्टीमुळे श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पायरी मार्गावरील तटबंदी कोसळली आहे. समर्थ महाद्वार ओलांडून गेल्यानंतर डाव्या हाताला पायरी मार्गावर काही वर्षांपूर्वीच ही तटबंदी करण्यात आली होती. याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी दुर्गप्रेमी आणि भाविक यांच्याकडून केली जात आहे.