उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप !
सांगली – देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याविषयी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळकरी विद्यार्थिनींना भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. या वेळी संघटन सरचिटणीस दीपक माने, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, शेखर इनामदार यांसह अन्य उपस्थित होते.
भाजप महिला मोर्चाच्या वतीने विविध उपक्रम !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप महिला मोर्चाच्या वतीने वृद्धाश्रमाला सहकार्य, अनाथ आश्रमाला साहाय्य, आरोग्य शिबिर, महिलांची आरोग्य पडताळणी, शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप, तसेच अपंग लोकांना सहकार्य करण्यात आले. प्रभाग क्रमांक १६ मध्ये महापालिकेच्या शाळा क्रमांक १५ मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सुनीताताई इनामदार, मनीषा शिंदे, सुश्मिता कुलकर्णी, लीना सावर्डेकर, राणी कांबळे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.