पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय आणि क्षेत्रीय कार्यालये येथे प्रतिदिन सकाळी राष्ट्रगीत लावणार !
पिंपरी – स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कामकाजाच्या दिवशी प्रतिदिन सकाळी १० वाजता राष्ट्रगीत लावले जाणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये ही प्रथा चालू करणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.