निवडणूक आयोग शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याची शक्यता ! – डॉ. अनंत कळसे, माजी प्रधान सचिव
मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी गोठवले जाण्याची शक्यता आहे, असे मत विधीमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले आहे.
‘शिवसेना कुणाची ?’, हा निर्णय देण्याआधी निवडणूक आयोग ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह ठाकरे किंवा शिंदे अशा कोणत्याही एका गटांना न देता कायमस्वरूपी गोठवू शकते. अशा स्थितीत दोन्ही गटाला नव्या चिन्हासह निवडणुका लढवाव्या लागतील. ‘शिवसेना नेमकी कुणाची, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कि शिंदे गट यांची ?’, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.