परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मंगलमय रथोत्सव पहातांना भावजागृती होणे आणि नंतर त्याचे स्मरण झाल्यावरही भावजागृती होणे !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने प्रत्येक वेळी भावजागृती होऊन मला हृदयात नेहमीच एक वेगळीच आत्मिक जाणीव अनुभवता येते. २२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा झालेला मंगलमय रथोत्सव पहातांना मला त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटून भावाश्रू आवरता येत नव्हते. या अनुभूतीचे वैशिष्ट्य, म्हणजे त्या दिवशी ज्या वेळी मला या भावजागृतीच्या क्षणांचे स्मरण होत होते, त्या प्रत्येक वेळी मला ते क्षण अनुभवता येऊन भावाश्रू येत होते आणि माझी भावजागृती होऊन मला प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.
‘हे गुरुमाऊली, आपल्याच कृपेने मला हे दिव्य क्षण अनुभवता आले’, यासाठी मी आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते आणि शरणागतभावाने प्रार्थना करते, ‘हे भगवंता, या जिवाला आपल्या चरणांजवळ अखंड ठेव.’
– अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२४.५.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |