किशनगंज (बिहार) येथे १९ शाळा रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ असतात बंद !
शाळांमध्ये ८० टक्के मुसलमान विद्यार्थी असल्याने अनेक वर्षांची परंपरा !
किशनगंज (बिहार) – जिल्ह्यातील १९ शाळांमध्ये कोणत्याही सरकारी आदेशाविना ‘शुक्रवार’ची सुटी देण्यात येत आहे. शिक्षण विभागाचे म्हणणे आहे की, हा मुसलमानबहुल भाग असल्याने ही परंपरा चालू झाली आहे.
After Jharkhand, 19 state-run schools in Muslim-dominated areas in Bihar’s Kishanganj district observe weekly offs on Fridayhttps://t.co/0ZkEFeqGSd
— OpIndia.com (@OpIndia_com) July 23, 2022
१. किशनगंज शहरातील लाइन उर्दू मध्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका झरना बाला साहा यांनी सांगितले की, ‘शुक्रवार’ची सुटी देण्यात आलेल्यांमध्ये एकही उर्दू शाळा नाही, सर्व हिंदी शाळा आहेत; मात्र शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या ८० टक्के आहे. वर्ष १९०१ मध्ये आमची शाळा स्थापन करण्यात आली आहे. तेव्हापासून येथे शुक्रवारी सुटी असते, तर रविवारी शाळा चालू असते.
२. किशनगंज जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुभाष कुमार गुप्ता यांनी सांगितले की, ही जुनी परंपरा आहे. याविषयी कोणताही आदेश नाही. या संदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकार्यांची चर्चा करून ‘शुक्रवारी’ शाळा चालू ठेवण्याविषयी निर्णय घेऊ.
३. किशनगंजचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी शुक्रवारच्या सुटीला विरोध केला आहे. ते म्हणाले की, शिक्षणापासून धर्म आणि जात वेगळे ठेवले पाहिजे.
संपादकीय भूमिका
|