बूंदी (राजस्थान) येथील सरकारी शाळेत तिसरी भाषा म्हणून संस्कृत ऐवजी उर्दू शिकवण्यासाठी धर्मांधांची धमकी
|
बूंदी (राजस्थान) – येथे सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात ‘काही धर्मांध एका सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापिकेला तिसरी भाषा म्हणून संस्कृत ऐवजी उर्दू भाषेचा समावेश करण्याची धमकी देत असून असे न केल्यास शाळेला टाळे ठोकण्याची धमकी देत आहे’, असे दिसत आहे. ही घटना अलोद गावातील म. गांधी राजकीय विद्यालय (इंग्लिश मीडियम) या शाळेतील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी भीतीपोटी गुन्हा नोंदवण्यात आला नसला, तरी पोलिसांनी याची चौकशी चालू केली आहे.
‘संस्कृत की जगह उर्दू पढ़ाओ, वरना लगा देंगे ताला’: राजस्थान के सरकारी स्कूल को धमकी, बोलीं प्रिंसिपल – इसी गाँव में नौकरी करनी है, नहीं दर्ज कराया मामला#Urdu #Rajasthan #Bundihttps://t.co/4pH7IJh7Tl
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 23, 2022
शाळेच्या मुख्याध्यापिकेने सांगितले की, मला या गावात नोकरी करायची आहे, त्यामुळे मी या वादामध्ये पडू इच्छित नाही. मला धमकी देणार्यांची भाषा गलिच्छ होती. त्यांनी मला धमकी दिली आणि ते निघून गेले. त्यांच्या धमकीमुळे शाळेत संस्कृत शिकवण्यात येत नाही. हा आदेश आम्हाला ‘वरून’ आला आहे. जर आम्हाला ‘वरून’ उर्दू शिकवण्याचा आदेश आला, तर आम्ही उर्दू शिकवू. सध्या तरी उर्दू शिकवण्याचा आदेश आला नाही. (पोलिसांनी याची चौकशी करावी आणि असे ‘वरून’ आदेश देणार्यांची नावेही जनतेसमोर आणावी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाइस्लामी देशांप्रामाणेच राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार कारभार करत असल्याने धर्माधांनी किती दहशत निर्माण केली आहे, हे लक्षात येते ! काँग्रेसनेचे देवभाषा संस्कृतला मृत भाषा ठरवून तिची गळचेपी केली आहे आणि करत आहे, हेच यातून लक्षात येते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |