सिंहगडावर हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण !
पुरातत्व विभागाकडून २ व्यावसायिकांना नोटीस
पुणे – सिंहगडावर काही हॉटेल व्यावसायिकांनी गडावरील ऐतिहासिक स्मारकांच्या परिसरात, तसेच पदपथावर ‘टेबल’ आणि खुर्च्या मांडून व्यवसाय थाटला होता. गडावर सगळीकडे प्लास्टिकच्या बाटल्या, खाल्ल्यानंतर उरलेला अनेक प्रकारचा कचरा गोळा झाला होता. यासंदर्भातील एक चलचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याने काही जागरूक नागरिकांनी याची माहिती पुरातत्व विभागाला दिली. त्यानंतर पुरातत्व विभागाने २ व्यावसायिकांना नोटीस बजावली. २५ जुलैपर्यंत संबंधित व्यावसायिकांकडून उत्तर न आल्यास कारवाई होणार आहे. (सिंहगडाची प्रतिमा केवळ पर्यटनस्थळ म्हणून निर्माण होण्यास कारणीभूत पुरातत्व विभागच आहे. गडांचे जतन आणि संवर्धन तर दूरच; परंतु गडांवरील अतिक्रमणही रोखू न शकणारे प्रशासन काय कामाचे ? – संपादक)