‘बुंदेलखंड एक्सप्रेस वे’वर उद्घाटनाच्या ५ व्या दिवशीच खड्डे पडले !
उत्तरप्रदेश – कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘बुंदेलखंड एक्सप्रेस वे’वर उद्घाटनाच्या ५ दिवसांतच पावसामुळे खड्डे पडले आहेत. १६ जुलै या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. या महामार्गावर सलेमपूरजवळ रस्त्याचा काही भाग खचला आहे. त्यामुळे तेथे अपघात झाला. आणखी एका ठिकाणीही रस्त्याचा काही भाग खचला आहे. उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांनी सांगितले, ‘‘या महामार्गामुळे वाहनांना वेग मिळेल आणि संपूर्ण बुंदेलखंडच्या औद्योगिक प्रगतीलाही गती मिळेल.’’