पुणे येथे २४ जुलै या दिवशी ‘लोकमान्य टिळक आणि आजची तरुणाई’ या विषयावर व्याख्यान
पुणे – नारायणपेठ येथील केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृह येथे २४ जुलै या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त सायं. ५.३० ते रात्री ८ या वेळेत ‘लोकमान्य स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणादायी चरित्रावर ‘लोकमान्य टिळक आणि आजची तरुणाई’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. लेखक, इतिहास अभ्यासक श्री. पार्थजी बावस्कर हे या कार्यक्रमाचे व्याख्याते आहेत.