हुपरी (जिल्हा कोल्हापूर) नगर परिषदेत तृतीयपंथी व्यक्तीची स्वीकृत नगरसेवकपदी निवड !
हुपरी (जिल्हा कोल्हापूर), २२ जुलै – हुपरी (जिल्हा कोल्हापूर) नगर परिषदेत तातोबा बाबूराव हांडे तथा देव आई या तृतीयपंथी व्यक्तीची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. आमदार प्रकाश आवाडे प्रणीत कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे. तातोबा हांडे यांना रेणुकाभक्त म्हणून ओळखले जाते. त्यांनी नगर परिषदेची निवडणूक ताराराणी आघाडीकडून लढवण्याचा प्रयत्न केला; मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांचे आवेदन छाननीत बाद झाले. यानंतर आघाडीच्या वतीने त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे एका तृतीयपंथीय व्यक्तीची नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे.