सोनिया गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसकडून ईडीच्या कार्यालयांवर मोर्चा !
मुंबई – काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मागील काही दिवसांपासून कारवाई चालू केली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने २१ जुलै या दिवशी मुंबई आणि नागपूर येथील संचालनालयाच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. विरोधी पक्षांच्या नेत्यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकार ही कारवाई करत असल्याचा आरोप आंदोलकांनी या वेळी केला. काँग्रेसच्या वतीने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली, तर नागपूर येथे माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पुणे, नाशिक आणि अमरावती येथेही आंदोलन करण्यात आले.