सातारा येथे वाहतूक पोलिसांनी बुजवले वाढे फाटा येथील खड्डे !
सातारा, २२ जुलै (वार्ता.) – शहराजवळ असणार्या वाढे फाटा येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी २० जुलै या दिवशी दुपारी जेसीबीद्वारे हे खड्डे बुजवले.
सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यांनी जेसीबी बोलवून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. पोलीस १ घंटा हे खड्डे बुजवत होते. वाहतूक पोलिसांना खड्डे बुजवतांना पाहून काही नागरिकांनीही त्यांना साहाय्य केले.
(कोणत्याही शासकीय यंत्रणेची वाट न पहाता वाहनचालकांच्या जीविताचा विचार करून जेसीबीद्वारे खड्डे बुजवणार्या वाहतूक नियंत्रण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन ! – संपादक)
साहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार आणि त्यांचे सहकारी यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. असे अधिकारी सर्वच शासकीय कार्यालयांत असावेत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
संपादकीय भूमिकासातारा नगरपालिका प्रशासन याची नोंद घेऊन संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर काय कारवाई करणार का ? |