शिरूर (पुणे) येथील निकृष्ट दर्जाचा डांबरी रस्ता हाताने उखडत असल्याने ग्रामस्थ संतप्त !
२ दिवसांत कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाकण्याची मागणी
पुणे – चाकण-शिक्रापूर रस्त्याला जोडणार्या जातेगाव (शिरूर) मधील रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आला आहे की, तो केवळ हाताने उखडला जात आहे. एक मासापूर्वी ६७ लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्याच्या दूरवस्थेवरून येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. ‘२ दिवसांत संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाका, तसेच संबंधित अधिकार्यांवरही निलंबनाची कारवाई करा’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (कंत्राटदाराला केवळ काळ्या सूचीत टाकून उपयोग नाही, तर त्याच्यावर कायमस्वरूपी बहिष्कारच घातला पाहिजे. आतापर्यंत झालेला सर्व खर्च त्याच्याकडून भरून घेतला पाहिजे, तसेच अशा प्रकारे जिथे जिथे निकृष्ट कामे केली आहेत, तोही खर्च भरून घेतला पाहिजे आणि त्याच्याविषयी तक्रार प्रविष्ट करून त्याला शिक्षा कशी होईल, हे पाहिले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकासंबंधित अधिकार्यांवर कोणती कठोर कारवाई झाली, ते जनतेला कळले पाहिजे ! |