कराड येथे २ धर्मांधांकडून नागरिकांना मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रयत्न !
|
कराड, २२ जुलै (वार्ता.) – येथील बैल बाजारा रस्त्यावर मोरया वसाहत परिसरात २ धर्मांधांनी केशकर्तनालय (सलून) व्यावसायिकास विनाकारण मारहाण केली. परिसरात रस्त्यावरून शिवीगाळ करत इतर व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्शाच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात केशकर्तनालयाचे मालक संतोष राऊत यांनी तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, साहिल आतार आणि पप्पू पठाण यांनी दुकानात येऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मला मारहाण करण्यास प्रारंभ केला. तसेच ‘आम्ही मलकापूरचे भाई आहोत. मलकापुरात रहायचे असेल, तर आम्ही म्हणतो तसेच तुम्ही वागले पाहिजे’, असे म्हणत मोठमोठ्याने शिवीगाळ केली.
या धर्मांधांनी इतरांनाही फायटरने (हाताच्या बोटात अडकवून वापरण्याचे शस्त्र) मारहाण केली असून काही जणांना रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले आहेत. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून आतार आणि पठाण यांना कह्यात घेण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठ सरकारच्या काळात दहशत माजवणार्या धर्मांधांना तत्परतेने कडक शिक्षा करावी, ही धर्मप्रेमी हिंदूंची अपेक्षा ! विनाकारण दहशत माजवून हिंदूंना मारहाण करण्याचा परवाना धर्मांधांना मिळाला आहे का ? या धर्मांधांना जामीन न मिळता कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! धर्मांध मारहाण करत असतांना आजूबाजूचे हिंदू काय करत होते ? हिंदू संघटित नसल्याचाच हा परिणाम आहे ! संघटित नसलेले हिंदू मार खाण्याच्या पात्रतेचे होतात, हे या घटनेवरून लक्षात येईल. |