रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या युवा साधना शिबिरात सहभागी झालेल्या गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील कु. साक्षी शिवगोंडा पाटील (वय २० वर्षे) यांना आलेल्या अनुभूती
१. ‘कु. वैष्णवी वेसणेकरताई (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २२ वर्षे) शिबिरात सूत्रे मांडत असतांना मला १५ – २० मिनिटे सुगंध येत होता.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ प्रार्थना सांगत होत्या. तेव्हा प्रार्थनेच्या शेवटी मला २ – ३ वेळा श्री महालक्ष्मीमाता दिसली. ‘ती डोळे उघडून परत बंद करत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला २ वेळा सुगंध आला.
आ. मी वहीवर सूत्रे लिहून घेत असतांना मला सतत निळसर प्रकाश दिसत होता. भावार्चना झाल्यावर माझे अंग पुष्कळ हलके झाले आणि माझे मन आनंदाने भारावून गेले.
इ. शिबिरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भावजागृतीचे प्रयत्न घेत होत्या. तेव्हा मला २ वेळा सूक्ष्म सुगंध आला, तसेच मला पुष्कळ गारवा जाणवला. ‘मी वार्यावर तरंगत आहे’, असे मला जाणवले.
ई. मला पुष्कळ आनंद जाणवला आणि शांत वाटले.
उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीत मला पुष्कळ प्रेमभाव जाणवत होता.
३. संतांच्या सत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. आम्हाला संतांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांचे मुख, तसेच हात आणि पाय यांचे तळवे गुलाबी रंगाचे दिसत होते. काही वेळाने त्यांच्या कपड्यांवर पिवळ्या रंगाचे पट्टे दिसले.
आ. काही क्षणांसाठी ‘मी साक्षात् श्रीकृष्णाच्या जवळ उभी आहे’, असे मला जाणवले. सत्संगामध्ये मला पुष्कळ सुगंध जाणवला आणि माझी भावजागृती झाली.
‘हे ईश्वरा, ‘मला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत खारीचा वाटा उचलायचा आहे. मला सतत शिकण्याच्या स्थितीत ठेव. कोटीशः कृतज्ञता !’
– कु. साक्षी शिवगोंडा पाटील (वय २० वर्षे), गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. (१७.११.२०२१)
|