‘मनीष सेन’ नाव सांगून मुलींवर बलात्कार करणार्या महंमद घोरी याला अटक !
भीलवाडा (राजस्थान) येथील घटना !
भीलवाडा (राजस्थान) – येथे एका भ्रमणभाष आस्थापनात व्यवस्थापक म्हणून काम करणार्या महंमद घोरी या वासनांधास पोलिसांनी अटक केली. सामाजिक माध्यमांमध्ये स्वत:चे नाव ‘मनीष सेन’ सांगून तो मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे आणि भाड्याने रहात असलेल्य त्याच्या खोलीवर बोलावून गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करत असे.
Rajasthan: NSUI leader Md Shahid Khan pretends to be ‘Manish Sen’ to trap a Hindu girl and blackmails her, arrestedhttps://t.co/FyLhUp2Ugp
— OpIndia.com (@OpIndia_com) July 22, 2022
१८ जुलै या दिवशीही एका महाविद्यालयीन युवतीला त्याने खोलीवर बोलावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्याने जवळपासच्या लोकांनी त्याला पकडून मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी महंमदच्या खोलीचे अन्वेषण केल्यावर त्याचे खरे स्वरूप समोर आले. त्याने आधारकार्डसारखी बनावट कागदपत्रे बनवली असून त्याच्या मूळ मुसलमान नावाची कागदपत्रेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत. तो मूळचा पाली शहरातील रहिवासी आहे.
संपादकीय भूमिका
|