सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण केल्यावर औषधाच्या डबीतून आवश्यक तेवढ्याच गोळ्या झाकणात पडणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘होमिओपॅथीच्या गोळ्यांना स्पर्श करायचा नसतो. रुग्णाने त्या गोळ्या डबीतून झाकणात घेऊन खायच्या असतात. परात्पर गुरु डॉक्टरांना होमिओपॅथी डॉक्टरांनी एका वेळी ३ गोळ्या घेण्यास सांगितले आहे. मी त्यांना गोळ्या देतांना पहिल्याच दिवशी झाकणात ३च गोळ्या पडल्या. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला. माझ्या तोंडवळ्यावरील आनंद पाहून परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘तीनच गोळ्या झाकणात पडल्या ना !’’ मी डबीतून गोळ्या झाकणात काढतांना मनातून ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असे म्हणत त्यांचे स्मरण करतो. त्या वेळी डबीतून झाकणात तीनच गोळ्या पडतात. ज्या वेळी ‘मी अन्य विचारांमुळे अस्वस्थ असतो, त्या वेळी झाकणात ३ गोळ्या पडत नाहीत’, असा अनुभव मी बर्‍याच वेळा घेतला आहे.’ – एक साधक

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक